बांदा /राकेश परब : येथे घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेमध्ये येथील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या परीक्षेसाठी यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियांका बावकर, सहाय्यक शिक्षक रोशन मोरजकर, सहाय्यक शिक्षिका सारिका वेरेकर यांचे मार्गदर्शन लाभले. इयत्ता पाचवी मधुन भिकाजी राऊळ, बिकेश राणे, विशाल गुप्ता, झीनत खान, शुभम गुप्ता, इयत्ता सहावी मधुन साईश देसाई, शैबाज देवरुखकर, समर प्रसाद, इब्राहिम शेख तर आठवी मधुन रश्मी देसाई, आर्यन सावंत, भुवनेश गवस, नजरीन मलिक, कृतिका सावंत या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले आहे.