बांदा /राकेश परब : (कै.) डॉ. संदीप कल्याणकर हे खरे जनसेवक होते. त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा कल्याणकर फौंडेशनच्या माध्यमातून त्यांची मित्रमंडळी पुढे नेत आहेत. याचा लाभ आतापर्यंत शेकडो रुग्णांनी घेतला आहे. भविष्यात संदीप कल्याणकर फौंडेशन हे निश्चितच रुग्णांसाठी आधारवड बनेल असे उद्गार बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी येथे काढले. येथील कै संदीप कल्याणकर फौंडेशनच्या कार्यालयाचे उद्घाटन फित कापून डॉ. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी डॉ. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप सावंत, डॉ. मिलिंद खानोलकर, उद्योजक भाऊ वळंजू, शशिकांत पित्रे, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, सरपंच अक्रम खान, माजी सरपंच मंदार कल्याणकर, डॉ. भालचंद्र कोकाटे, डॉ. तुषार कासकर, सुनील धामापूरकर, मंगलदास साळगावकर, मनोज कल्याणकर, गुरुनाथ नार्वेकर, गुरू कल्याणकर, आबा धारगळकर, श्रुती कल्याणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उद्योजक शशिकांत पित्रे व भाऊ वळंजू यांनी फौंडेशनसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची देणगी दिली. श्वेता कोरगावकर यांनी पंधरा हजार रुपयांचे वैद्यकिय साहित्य तसेच अपेक्षा नाईक यांनी देखील वैद्यकीय साहित्य देणगी दाखल दिले. सर्व देणगीदारांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी डॉ. मिलिंद खानोलकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिलीप सावंत यांनी केले. सूत्रसंचालन मंगलदास साळगावकर यांनी मानले. आभार मंदार कल्याणकर यांनी मानले. यावेळी ज्या दात्याना वैद्यकीय स्वरूपात मदत करायची आहे किंवा ज्या रुग्णांना वैद्यकीय साहित्याची गरज आहे त्यानी मनोज कल्याणकर किंवा मंगलदास साळगावकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -