ओरस / प्रतिनिधी : गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील हे 26 डिसेंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सकाळी 9.10 वा. चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने ओरोसकडे प्रयाण, सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे सिंधुदुर्ग जिल्हा आढावा बैठक, 11.45 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोटारीने शरद कृषी भवन कडे प्रयाण, दुपारी 12 वा. शरद कृषी भवन ओरोस – सिंधुदुर्गनगरी येथे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संदर्भात चर्चा, दुपारी 12.45 वा. शरद कृषी भवन, ओरोस – सिंधुदुर्गनगरी येथे पत्रकार परिषद, दुपारी 1.15 ते 1.50 राखीव. दुपारी 1.50 वा. ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथून मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 2.40 वा. चिपी विमानतळ येथून विमानाने रत्नागिरीकडे प्रयाण.