धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची ठरली रेलचेल;साईपादुकांची पालखी मिरवणूकीने भाविक मंत्रमुग्ध..
कणकवली / उमेश परब – कणकवली तालुक्यातील असलदे डामरेवाडी येथील श्री.सोमवती देवी सेवा मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे दत्तजयंती निमित्त साईपादुकांची पालखी मिरवणूक व ११ वा वर्धापन दिन सोहळा,सत्यनारायण महापूजा उत्सव १७ व १८ डिसेंबर २०२१ रोजी उत्साहात पार पडला. यावर्षी साई पालखी सोहळा कोरोनाचे नियम पाळून पार पडला व यंदा साईपालखी मिरवणूक असलदे ते श्री स्वामी समर्थ मठ,हडपिड अशी काढण्यात आली.साई दर्शनासाठी चाकरमानी कोकणात साईदर्शनाला हजेरी लावली होती .नवसाला पावणाऱ्या साई बाबा चरणी असंख्य भक्तांना रांगा लावल्या होत्या.सत्यनारायणाची महापूजा , साईंची महाआरती व महाभंडारा, महिलांसाठी हळदी – कुंकू कार्यक्रम, ” लहान व मोठ्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, साईबाबांच्या पालखीची मिरवणूक, फुगडीचा कार्यक्रम देवगड मिठमुंबरी , श्री गणेश दशावतार नाट्य मंडळ , कडावल , ता . कुडाळ यांचे तुफान विनोदी नाट्य प्रयोग सत्व परिक्षा सादर करण्यात आले.त्याला चांगला प्रतिसाद लाभला.कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे मंडळाचे कार्याध्यक्ष – विजु ना. डामरे अध्यक्ष- सुरेश डामरे , खजिनदार – विजय डामरे , युवा मंडळ – प्रथमेश डामरे , कल्पेश डामरे ,रोहन डामरे , मनिष डामरे, युवराज डामरे , स्वप्नील डामरे , राजन मालवणकर, ओमकार डामरे , एस. एम. डामरे यांनी सर्वांचे आभार मानले.