शिरगाव/संतोष साळसकर: देवगड तालुक्यातील ओंबळ येथील ग्रामदैवत श्री देवी पावणाई मंदिरात गुरू. दि. ३० डिसें. रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यात कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलें आहे.स.११ वा. घटस्थापना,११,३० वा. महाआरती,दुपारी १२ वा. पालखी मिरवणुक,१२.३० वा . दर्शन सोहळा व तिर्थप्रसाद , दु.१२ ते रात्री ८ वाजेपर्यंत स्थानिक सुस्वर भजने, ग्रामस्थ ,श्री देवी पावणाई देवस्थान ट्रस्ट , श्री देवी पावणाई देवस्थान समिती मुंबई यांनी केले आहे.