ओरस/प्रतिनिधी : कणकवली येथील नगरपंचायत वाचनालय हॉल येथे आज 24 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी केंद्र शासनाकडून “A Turning Point for Indian Consumers : The consumers Protection Act 2019” ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सीताराम उर्फ दादा कुडतरकर, असी. रोटरी क्लब कणकवली, सदस्य, भ्रष्टाचार निर्मुलन सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कणकवलीचे तहसिलदार रमेश पवार यांनी केले आहे.