२४ डिसेंबर दिनविशेष.
१७७७: कॅप्टन जेम्स कूक यांनी प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.
१९०६: रेजिनाल्ड फेसेंडेन यांनी प्रथमच एक कविता वाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले.
१९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा.
१९२४: अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले.
१९४३: दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हे दोस्त राष्ट्रांच्या फौजांचे सरसेनापती बनले.
१९५१: लिबीया हा देश ईटलीकडून स्वतंत्र झाला.
१९७९: सोविएत युनियनने अफगणिस्तानवर आक्रमण केले.
१९९९: काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्या इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.
२०१६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले.