प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई , अभियान संयोजक तथा जिल्हा सरचिटणीस , भाजपा सिंधुदुर्ग .
ब्यूरो न्यूज- विवेक परब : संपूर्ण देशात २५ डिसेंबर या दिवशी भाजपा च्या वतीने श्रद्धेय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती *सुशासन दिवस* म्हणून साजरी केली जाणार आहे . यावर्षीही सुशासन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात कार्यक्रमाचे आयोजन करावे असे आवाहन प्रदेश भाजपाने केले आहे . त्यामध्ये निमंत्रितांचे संमेलन व व्याख्यान , अटलजींच्या प्रतीमेचे पुजन , ग्रंथालयास अटलजींच्या पुस्तकाचे संच भेट देणे , स्वच्छता अभियानाचे आयोजन करणे , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षात घेतलेले निर्णय तसेच योजनांची माहिती सर्वसामान्यांना देणे , E श्रम कार्ड वितरीत करणे , त्याचप्रमाणे मनपा , नपा , जि.प. , पंचायत समिती मधील सुशासनातील यशासाठी उत्तम कामगिरी केलेल्या भाजपा लोकप्रतिनिधी ची निवड करुन त्यांना *सुशासन अटल पुरस्कार* देवुन सत्कार करणे असे कार्यक्रम आयोजित करण्यास सांगितले आहे . याच अनुषंगाने वेंगुर्ले शहरातुन आम जनतेतून निवडुन आलेले भाजपा चे यशस्वी नगराध्यक्ष राजन गिरप यांचा सत्कार करण्यात येणार आहे . नगराध्यक्ष राजन गिरप यांनी गेल्या पाच वर्षांत वेंगुर्ले शहराचा कायापालट केला .तसेच पर्यटकांना आकर्षित करणारी विकास कामे करून , वेंगुर्ले पर्यटन शहर बनविले .त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या बाबतीत शहराचा दर्जा टिकवून ठेवत स्वच्छतेचे देशपातळीवरील पुरस्कार मिळविले . त्याचप्रमाणे कला – क्रीडा – सांस्कृतिक – सामाजिक उपक्रम राबवुन जनमानसात वेंगुर्ले नगरपरिषदेकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला .या कार्याची दखल घेऊन वल्ड रेकॉर्ड इंडिया संस्थेतर्फे राष्ट्रीय स्तरावरील *सर्वोत्कृष्ट नगराध्यक्ष पुरस्कार* राजन गिरप यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला . याच कार्याची दखल घेऊन भाजपा च्या वतीने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी १० = ३० वाजता तालुका कार्यालयात नगराध्यक्ष राजन गिरप यांना ” सुशासन अटल पुरस्कार ” देवुन सन्मानित करणार असल्याचे अभियान संयोजक तथा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले .