३० जाने. ला संगमेश्वर(रत्नागिरी) येथे पुरस्कार वितरण सोहळा.
शिरगाव/संतोष साळसकर : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील विश्व समता कला मंच लोवले या सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील शिरगाव-बौद्धवाडी येथील प्रख्यात जादूगार भरतकुमार नाईक यांना विश्व समता समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण ३० जाने. रोजी स.११ वा. कबनूरकर हॉल, साखरपा,संगमेश्वर(रत्नागिरी) येथे होणार आहे. अशी माहिती विश्व समता कलामंच चे संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव यांनी दिली. ही संस्था गेली १५ वर्षे बुद्ध,शिवराय,फुले,शाहू,आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची जोपासना करीत सामाजिक,शैक्षणिक,साहित्यिक, सांस्कृतिक,धार्मिक,कला,क्रीडा,जल,पर्यावरण क्षेत्रात अविरतपणे कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.राज्यस्तरीय पुरस्कार असे आहेत.समाजभूषण पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील शिरगाव येथील प्रख्यात जादूगार भरतकुमार नाईक,सांगली-कडेगाव येथील अशोक बापू पवार,रत्नागिरी-खेड येथील संजय यशवंत कापसे,बीड येथील विश्वनाथ भीमसेन आचार्य,गडचिरोली येथील प्रा.गौतम दयानंद डांगे,लांजा-हरचे येथील किरण यशवंत धनावडे,पालघर-वसई येथील विनोद युवराज बोरकर, यांना तर साहित्यिकरत्न पुरस्कारासाठी-कोल्हापूर-आजरा येथील सौ.प्रीती रमेश कांबळे,खेड-दापोली येथील गणेश तुळशीराम मोरे,सांगली येथील सिराज करीम शिकलगार,सांगली-बनपुरी येथील अरुण विठ्ठल कांबळे,पुणे-हडपसर येथील कविता बी.काळे,औरंगाबाद येथील सौ.सुनीता गोविंद कपाळे, अमरावती येथील सौ.विजया ज्ञानेश्वर भांगे,जळगाव येथील गणेश रामदास निकम,चिपळूण येथील परबीन नबील मिठागिरी,अकोला येथील रामकृष्ण विठ्ठल शिरसाट,कणकवली-फोंडाघाट येथील डी.डी.उर्फ जनीकुमार कांबळे, पनवेल येथील तानाजी बबन धरणे,नागपूर येथील अर्चना चव्हाण,मुंबई येथील शरद शांताराम पवार,यांना तर आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी रत्नागिरी-साखरपा येथील भरत कमलचंद माने यांना तर प्रेरणा गौरव पुरस्कारासाठी चिपळूण-ताम्हाणमळा येथील सुमिता चंद्रकांत मोहिते यांना तर आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी राजापूर येथील सौ.मंगला कुंडलिक गवळी,रत्नागिरी-खेड येथील सौ.प्रज्ञा दिलीप सावंत,पुणे येथील कांचन सुनील मुन,समाजरत्न पुरस्कारासाठी मुंबई येथील भीमराव शिवराम गमरे,यांना तर क्रीडारत्न पुरस्कारासाठी राजापूर येथील अबूबकर पापालाल बाडीवाले यांना तर आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी कुडाळ येथील राजेश पुरुषोत्तम कदम,चिपळूण-सावर्डे येथील दिलीप ज्ञानेश्वर डोंगरे, खेड येथील किरण दगडू गांगावले,रत्नागिरी येथील इम्तियाज इमामुद्दीन सिद्दीकी,गुहागर येथील प्रदीप रामनाथ पडवळ,खेड-जामगे येथील दत्तात्रय पांडुरंग जासूद,नाशिक येथील काळू सीताराम भोये,दापोली येथील प्रमोद प्रभाकर गमरे,कोल्हापूर-करवीर येथील राजेंद्र धोंडीराम जाधव,लांजा येथील दिलीप शंकर चव्हाण यांना तर आदर्शयुवा पुरस्कारासाठी दापोली-दाभीळ येथील तुषार गौतम नेबरेकर,तर कलारत्न पुरस्कारासाठी मुंबई-डोंबिवली येथील नरेंद्र अनंत पवार यांना जाहीर झाले आहेत