“तुच माझा पाठीराखा” नाट्य प्रयोग होणार सादर
चिंदर/ विवेक परब :मालवण तालुक्यातील चिंदर गावच्या पाच दिवस चालु असणाऱ्या आई भगवती माऊली जत्रोत्सवाची आज लळीत उत्सवाने सांगता होणार आहे संध्याकाळी स्थानिक भजन, पुराणवाचन किर्तन, दिवटे पाजळणे, भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी तसेच मुंबई मंडळ यांच्यातर्फे कोरोना योध्दानचा सत्कार तसेच जेष्ठ नागरीकांचा सत्कार तसेच चिंदर सेवा संघ आयोजित रक्तदान शिबिराची गौरव पत्रे दात्याना दिली जाणार आहेत.
श्री भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी व शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई यांच्या पुढाकाराने रक्ताच्या नात्याच्या बापाने मुलीच्या शीलाचा मांडलेला बाजार पहाडा सारखा उभा असलेला भाऊ हि कहाणी.लेखक-अरविंद रुणकर, दिग्दर्शक-सुभाष तसेच आशिष नाबर (नाट्यचित्रपट अभिनेते) सह-दिग्दर्शक-मंगेश नाटेकर, गीत रचनाकार-बाबली गांवकर, संगित साथ-बुवा संदिप परब, तबला साथ-गणेश गोगटे, पार्श्वसंगित-परशुराम गुरव, रंगभूषा-तारक कांबळी,ध्वनी संकलन,प्रकाश योजना-शरद कांबळी, कलाकार म्हणून दिगंबर जाधव, मंदार वराडकर, रवि गावडे, हरिश्चद्र चव्हाण, वृषभ वराडकर, प्रदिप परब, रोहन कोदे, नाट्य अभिनेत्री म्हणून सायली शिरवलकर तर विनोदी भूमिकेत संजय हडपी आणि पिंट्या दळवी काम करणार आहे. नाट्यप्रयोग रात्री १०वाजता भगवती रंगमंच चिंदर भटवाडी येथे होणार आहे. हा नाट्य प्रयोग म्हणजे भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी यांच्या जणू एकीचेच दर्शन आहे.