बांदा / राकेश परब : बांदा ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत भाजपा चे उमेदवार राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी महाविकास आघाडी उमेदवार समीर पेळपकर यांचा धुव्वा उडवित विजय संपादन केला. बाळू सावंत यांना ३३२ मते तर सेनेचे पेळपकर यांना १२३ मते पडली. सरपंच अक्रम खान यांनी आपला गड कायम राखला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष एकत्र येऊनही त्यांचे उमेदवार समीर पेळपकर यांना पराभव पत्करावा लागला.सावंतवाडी तालुक्यात झालेल्या चार ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. यात बांदा ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत राजाराम उर्फ बाळू सावंत, देवसू-दाणोलीत किसन सावंत, निरवडे ग्रामपंचायतीत हरी वारंग, तर सांगेली ग्रामपंचायतीमध्ये श्रीधर लाड यांनी विजय मिळवला. ही मतमोजणी प्रक्रिया येथील तहसीलदार कार्यालयात पार पडली.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -