मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाच्या वतीने पुकारलेल्या २२ डिसेंबर पासूनच्या बेमुदत धरणे आंदोलनास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने जाहीर व सक्रीय पाठींबा दिला आहे. ग्रामविकास विभागाने दि . ७ एप्रिल २०२१ रोजी शिक्षक आंतरजिल्हा बदलीचे नवीन धोरण जाहीर केले आहे . परंतु त्याची कार्यवाही एकदाही झालेली नाही . त्यामुळे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे . शासनामार्फत कोणत्याही प्रकारची शिक्षक भरती होत नसल्याने दिवसेंदिवस रिक्त पदाची टक्केवारी वाढत आहे . त्याचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंतरजिल्हा बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांना बसत आहे . त्यामुळे १० % रिक्त पदाची अट रद्द करून आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत प्राधान्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करावा . शिक्षक आंतरजिल्हा बदलीचे ऑनलाईन पोर्टल लवकरात लवकर तयार करून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरु करावी . खाजगी शिक्षकांचे समायोजन जनगणना व निवडणूक आचारसंहितांच्या पार्श्वभूमीवर बदली प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी . तसेच बदली प्रक्रिया सुरु करण्या अगोदर ऑनलाईन पोर्टलवर जिल्हानिहाय व प्रवर्ग निहाय रिक्त पदांचे अहवाल प्रसिद्ध करावे . जेणेकरून शिक्षकांना चार जिल्ह्यांचा प्राधान्याने योग्य पर्याय देता येईल . या व इतर मागण्यांसाठी खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने आझाद मैदानावर पुकारलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने सक्रीय व जाहीर पाठींबा दिल्याची माहिती अध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -