कणकवली / उमेश परब – नवसाला पावणारे हाकेला धावणारे म्हणून प्रसिद्ध असलेल्या हळवल गावचे जागृत देवस्थान श्री देव रवळनाथ शिवराई मंदिरात वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक २२ डिसेंबर रोजी सम्पन्न होत आहे. हा जत्रोत्सव कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात येणार आहे. हळवल गावचे ग्रामदैवत श्री रवळनाथ शिवराई मंदिरात वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सकाळी श्रींची विधिवत पूजा त्यानंतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री तरंग व भाविक यांच्यासह मंदिर प्रदक्षिणा होणार आहे व त्यानंतर रात्री उशिरा बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाचा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. नवसाला पावणारे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी असते या जत्रोत्सवात भाविकांनी उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन हळवल ग्रामस्थांनी केले आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -