ओरोस/ प्रतिनिधी : एमआयडीसी नेरूर गोधयाळे ( सुकेतळे) येथील श्री ब्राम्हण देवाचा हरिनाम सप्ताह सोहळा २५ व २६ डिसेंबर रोजी संपन्न होणार असल्याने यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवसाला पावणारा देव अशी ख्याती असलेल्या या देवस्थानाच्या हरीनामसप्ताह कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक ब्राह्मणदेव भक्तमंडळ यांनी केले आहे.
एमआयडीसी नेरूर गोधयाळे ( सुकेतळे ) येथील श्री ब्राम्हण देवाचा हरिनाम सप्ताह सोहळा २५ व २६ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार २५ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता गणेशपूजन, ८.३० ते ११ अखंड नामस्मरण, सकाळी १० वाजता शालेय विद्यार्थ्यांची दिंडी, सायंकाळी ४ वाजता ह.भ.प. भाऊ नाईक यांचे कीर्तन, ७ वाजता दूरदर्शन तसेच आकाशवाणी कलाकार स्वप्नील गोरे यांचे गायन, रात्री ८.३० वाजता ग्रामस्थाची भजने, रात्री १० ते २ ट्रिकसिनयुक्त आकर्षक दिंड्या, पहाटे ३.३० वाजता महापुरुष भजन मंडळ देवबाग यांचे भजन व काकड आरती करण्यात येणार आहे.
तसेच रविवार २६ डिसेंबर रोजी सकाळपासून नामस्मरण, गाऱ्हाणी, नवस, सकाळी ९.३० वाजता मैदानी खेळ, १०.३० वाजता अखंड नामस्मरण, काला, गंगास्नान, प्रसाद वाटप व नामसप्ताहाची सांगता आदी कार्यक्रम होणार आहेत. नवसाला पावणारा देव अशी ख्याती असलेल्या या देवस्थानाच्या हरीनामसप्ताह कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक ब्राह्मणदेव भक्तमंडळ यांनी केले आहे.