21.6 C
Mālvan
Monday, December 23, 2024
IMG-20240531-WA0007

वक्तृत्व स्पर्धेमधून राष्ट्रनिर्माणाचा जागर

- Advertisement -
- Advertisement -

नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग आयोजित‌ जिल्हस्तरिय‌ वत्कृत्व स्पर्धा संपन्न

कणकवली / उमेश परब – आझादीका अमृत महोत्सवा अंतर्गत आणि नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग यांच्या विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरिय वत्कृत्व स्पर्धा नुकतीच‌ ओरोस‌ येथिल जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह येथे पार‌ पडली.आझादीका‌ अमृत महोत्सव अ़तर्गत‌ संपुर्ण देशभर‌ विविध उपक्रम सुरु असुन त्याचाच‌ एक‌ भाग म्हणून नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यातील युवा वर्गासाठी देशभक्ती और राष्ट्र निर्माण या विषयावर‌ आधारित वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. तालुकास्तरीय निवड चाचणीतून तीन स्पर्धकांची जिल्हास्तरिय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. या जिल्हास्तरीय स्पर्धेचे ओरोस‌ येथे आयोजन करण्यात आले होते. नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग‌ आयोजित या वत्कृत्व स्पर्धेतील विजेते – भूवनेश प्रभूखानोलकर (वेंगुर्ले)- प्रथम क्रमांक पटकावला तर यशोधन देवधर (देवगड) – द्वितीय आणि निकीता ‌शर्भा (मालवण) – तृतीय. विजयी स्पर्धकांना अनुक्रमे ५०००/- ,२०००/-, १०००/- रोख आणि सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवुन गौरविण्यात आले. इतर‌ सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्र देवुन गौरविण्यात आले. यामधील भूवनेश प्रभूखानोलकर यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.जिल्हास्तरीय वत्कृत्व स्पर्धेसाठी संपुर्ण जिल्ह्यातुन 17 स्पर्धक सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय‌ येथिल सभागृहात‌ आयोजित‌ या कार्यक्रमासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीम. राजश्री सामंत,जिल्हा क्रिडा अधिकारी श्री. विजय शिंदे, नेहरू युवा केंद्र कार्यक्रम अधिकारी श्रीम. अपेक्षा मांजरेकर आदी जीवन शिक्षा केंद्राचे प्रशिक्षक श्री. सहदेव पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. एन. ए.कारेकर ,श्री. एस. आर. दर्पे आणि श्री. व्ही. डी. टाकळे यांनी परिक्षणाचे काम पाहिले.कार्यक्रमाच्या उद्घटनास जिल्हा क्रिडा अधिकारी श्री. विजय शिंदे हे उपस्थित होते. शासनाकडून युवकांसाठी असलेल्या विविध उपक्रमांचा लाभ युवकांनी घ्यावा आणि कौशल्य विकास साधावा असे आव्हान त्यांनी केले. वक्तृत्व ही एक शैली आहे आणि प्रत्येकाने स्वतःची शैली निर्माण केली पाहिजे. चार माणसांमध्ये बोलता येणं ही आज काळाची गरज बनली आहे; असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या अधिकारी श्रीम. राजश्री सामंत कार्यक्रमाच्यावेळी मार्गदर्शनात म्हणाल्या. देशभक्ती और राष्ट्र निर्माण या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी नाविन्यपूर्ण मते मांडली. या नव्या भारताच्या आवाजाने सभागृह भारावून गेला.सातत्याने नवीन आव्हानांना स्विकारत स्वतः क्रियाशील राहावे आणि राष्ट्र निर्मितीसाठी NYKS च्या उपक्रमांमध्ये खारीचा वाटा उचलावा असे आवाहन नेहरू युवा केंद्र कडून युवकांना करण्यात आले.जिल्हा युवा अधिकारी श्री.मोहित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरु युवा केंद्राच्या सर्व समन्वयकांनी हा कार्यक्रम पार पाडला. या‌ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रीना दुदवडकर यांनी केले तर आभार सोनाली धर्णे यांनी मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग आयोजित‌ जिल्हस्तरिय‌ वत्कृत्व स्पर्धा संपन्न

कणकवली / उमेश परब - आझादीका अमृत महोत्सवा अंतर्गत आणि नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग यांच्या विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरिय वत्कृत्व स्पर्धा नुकतीच‌ ओरोस‌ येथिल जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह येथे पार‌ पडली.आझादीका‌ अमृत महोत्सव अ़तर्गत‌ संपुर्ण देशभर‌ विविध उपक्रम सुरु असुन त्याचाच‌ एक‌ भाग म्हणून नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यातील युवा वर्गासाठी देशभक्ती और राष्ट्र निर्माण या विषयावर‌ आधारित वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. तालुकास्तरीय निवड चाचणीतून तीन स्पर्धकांची जिल्हास्तरिय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. या जिल्हास्तरीय स्पर्धेचे ओरोस‌ येथे आयोजन करण्यात आले होते. नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग‌ आयोजित या वत्कृत्व स्पर्धेतील विजेते - भूवनेश प्रभूखानोलकर (वेंगुर्ले)- प्रथम क्रमांक पटकावला तर यशोधन देवधर (देवगड) - द्वितीय आणि निकीता ‌शर्भा (मालवण) - तृतीय. विजयी स्पर्धकांना अनुक्रमे ५०००/- ,२०००/-, १०००/- रोख आणि सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवुन गौरविण्यात आले. इतर‌ सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्र देवुन गौरविण्यात आले. यामधील भूवनेश प्रभूखानोलकर यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.जिल्हास्तरीय वत्कृत्व स्पर्धेसाठी संपुर्ण जिल्ह्यातुन 17 स्पर्धक सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय‌ येथिल सभागृहात‌ आयोजित‌ या कार्यक्रमासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीम. राजश्री सामंत,जिल्हा क्रिडा अधिकारी श्री. विजय शिंदे, नेहरू युवा केंद्र कार्यक्रम अधिकारी श्रीम. अपेक्षा मांजरेकर आदी जीवन शिक्षा केंद्राचे प्रशिक्षक श्री. सहदेव पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. एन. ए.कारेकर ,श्री. एस. आर. दर्पे आणि श्री. व्ही. डी. टाकळे यांनी परिक्षणाचे काम पाहिले.कार्यक्रमाच्या उद्घटनास जिल्हा क्रिडा अधिकारी श्री. विजय शिंदे हे उपस्थित होते. शासनाकडून युवकांसाठी असलेल्या विविध उपक्रमांचा लाभ युवकांनी घ्यावा आणि कौशल्य विकास साधावा असे आव्हान त्यांनी केले. वक्तृत्व ही एक शैली आहे आणि प्रत्येकाने स्वतःची शैली निर्माण केली पाहिजे. चार माणसांमध्ये बोलता येणं ही आज काळाची गरज बनली आहे; असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या अधिकारी श्रीम. राजश्री सामंत कार्यक्रमाच्यावेळी मार्गदर्शनात म्हणाल्या. देशभक्ती और राष्ट्र निर्माण या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी नाविन्यपूर्ण मते मांडली. या नव्या भारताच्या आवाजाने सभागृह भारावून गेला.सातत्याने नवीन आव्हानांना स्विकारत स्वतः क्रियाशील राहावे आणि राष्ट्र निर्मितीसाठी NYKS च्या उपक्रमांमध्ये खारीचा वाटा उचलावा असे आवाहन नेहरू युवा केंद्र कडून युवकांना करण्यात आले.जिल्हा युवा अधिकारी श्री.मोहित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरु युवा केंद्राच्या सर्व समन्वयकांनी हा कार्यक्रम पार पाडला. या‌ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रीना दुदवडकर यांनी केले तर आभार सोनाली धर्णे यांनी मानले.

error: Content is protected !!