कणकवली / उमेश परब – सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग मार्फत गेली १० वर्षे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील ६५ वर्षावरील जेष्ठ कीर्तनकार, मृदंगमनी, संप्रदायाचे प्रचारक यांना संप्रदायाचा मानाचा संतसेवा पुरस्कार दिला जातो. यावर्षी हे पुरस्कार ह.भ.प.रामचंद्र अर्जुन सातोसे कुसबे ता.कुडाळ,व ह.भ.प.मधुकर कृष्णा कडव आंबेगाव ता.सावंतवाडी यांना जाहीर करण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत पुरस्कार निवड समितीने हे पुरस्कार जाहीर केले. यावेळी जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर,उपाध्यक्ष .हरिश्चंद्र पारधीये,सचिव श्री राजू राणे,मधुकरराव प्रभुगावकर हे उपस्थित होते. हे पुरस्कार २६ डिसेंबर रोजी होणाऱ्या वारकरी जिल्हा मेळाव्यात प्रदान करण्यात येणार आहेत.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -