कणकवली / उमेश परब – कणकवली तालुक्यातील घोणसरी येथील सेंट सेबेस्तीन चर्च येथे सभापती श्री मनोज रावराणे यांच्या स्वनिधितून मंजूर झालेल्या घोणसरी चर्च येथे शौचालय बांधणे व पाणीपुरवठा करणे या दोन विकास कामांचा शुभारंभ ख्रिस्ती धर्माचे फादर यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली पंचायत समितीचे सभापती श्री मनोज रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी घोणसरी सरपंच सौ.मृणाल पारकर,उपसरपंच विलास मराठे, ग्रा.पं.सदस्य रवी शिंदे, माजी सरपंच मॅक्सी पिंटो,भाजपा ओबीसी सेल शक्तीकेंद्र प्रमुख दत्ताराम गुरव,भाजपा सो.मीडिया तालुका सदस्य नितीन पारकर,भाजपा बूथ अध्यक्ष उमेश राऊत,विजय एकावडे,अनिल राणे तसेच घोणसरी चर्चचे अध्यक्ष राजू रैस,सचिव जेरोन बारेत,खजिनदार व्हॅलेरीयन पिंटो, रॉबर्ट रैस, इशेद पिंटो, रोपेद पिंटो,बबन पिंटो,ठेकेदार मिहिर मराठे तसेच सर्व महिला ख्रिस्ती बांधव ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
यावेळी सभापती मनोज रावराणे बोलताना म्हणाले की , ज्यावेळी मी सभापती झालो त्यावेळी ख्रिस्ती बांधवांच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला होता त्यावेळी मी जो शब्द दिला होता तो आज पूर्ण करताना अतिशय आनंद होत आहे.नेहमीच ख्रिस्ती समाज हा आमच्या पाठीशी उभा राहिला या पुढेही असेच आमच्या पाठीशी उभे रहा अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच मा.सरपंच मॅक्सी पिंटो यांनी मागणी केलेल्या स्मशानभूमी कंपाऊंड वॉलच्या कामासाठी ही पाठपुरावा करून ही मागणी ही लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. मॅक्सी पिंटो यांनी मानले.