विशाल गोलतकर यांनी साकारलेली रांगोळी ठरली लक्षवेधी
चिंदर/विवेक परब : चिंदर गावातील उद्योन्मुख कलाकारांना व्यासपिठ मिळवून देण्यासाठी चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज सभागृह चिंदर येथे भरवण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा आणि प्रदर्शनात माधुरी माळगांवकर हिने प्रथम क्रमांक मिळवला तसेच ललना गजानन पाटणकर हिने व्दितिय तर नेहा विद्याधर मुणगेकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. प्रियांका धोंडू वारडकर हिला प्रथम उत्तेजनार्थ तर प्रतिक्षा सुर्यकांत अपराज हिला व्दितिय उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत मानसी विठ्ठल पाताडे, सृष्टी संदेश चेंदवनकर, आकांक्षा नारायण परुळेकर, यश प्रशांत गवस, अंकिता उदय मांजरेकर, संध्या दिलीप पाटणकर आणि करिना महादेव माळगांवकर यांनी सहभाग घेतला तर रांगोळीकार व परिक्षक विशाल गोलतकर यांनी साकारलेली केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची रांगोळी लक्ष वेधी ठरली. ग्रामपंचायत सदस्य दुर्वा पडवळ व योजना माळगांवकर यांनी हि सुंदर रांगोळी साकारली.
रांगोळी स्पर्धेतचे उद्घाटन जि.प. अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी केले तर बक्षिस वितरण माजी खासदार डाँ निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. डाँ. राणे यांनी या उपक्रमाचे खूप कौतुक केले व ग्रामीण भागातील कलाकारांनसाठी आपण नेहमी पाठिशी राहू असे सांगितले. स्पर्धा परीक्षक म्हणून विशाल गोलतकर यांनी काम पाहिले. तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोरेश्वर गोसावी, संजय केरकर, सिध्देश गोलतकर यांनी मेहनत घेतली. रांगोळी स्पर्धेसाठी सरपंच राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वै, भाजप तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर, संतोष कोदे, संतोष गावकर, प्रकाश मेस्री, देवेंद्र हडकर, दत्ता वराडकर, शेखर कांबळी, विश्राम माळगांवकर, आबा पवार यांचे सहकार्य लाभले.