आचरा /विवेक परब : चिंदर कोंडवाडी येथील मुंबईस्थित राहिवासी लवू सीताराम अपराज यांचा “अथर्व लवू अपराज” : : याची कबड्डी या खेळ प्रकारात मुबंई जिल्हा संघात निवड झाली आहे. अथर्व महाराष्ट्र हायस्कूलचा इयत्ता ९ वी चा विद्यार्थी आहे. तसा कबड्डी ह्या खेळ प्रकारात खूप जास्त शारीरिक ताकद आणि मानसिक स्वास्थ टिकविणे गरजेचे आहे. प्रतिस्पर्धी काय दमाचा आहे हे त्यांच्याशी दोन हात केल्याशिवाय कळणे केव्हाही अशक्यच.कबड्डी हा सांघिक खेळ आहे. सात खेळाडूंच्या दोन संघांमध्ये खेळला जातो, खेळाचा उद्देश एकच खेळाडू ने विरुद्ध संघाच्या कोर्टात प्रवेश करायचा आहे, ज्याला “रेडर” म्हणून संबोधले जाते, विरुद्ध संघाच्या अर्ध्या कोर्टात धाव घेणे, शक्य तितक्या त्यांच्या बचावकर्त्यांना स्पर्श करणे आणि सर्व बचावकर्त्यांद्वारे हाताळल्याशिवाय आणि एका दमात, कोर्टाच्या अर्ध्या भागाकडे परत जातात. रेडरने टॅग केलेल्या प्रत्येक खेळाडूसाठी गुण मिळवले जातात, तर विरोधी संघ रेडरला थांबवल्याबद्दल एक गुण मिळवतो. खेळाडूंना स्पर्श केल्यास किंवा हाताळले गेल्यास खेळातून बाहेर काढले जाते, परंतु त्यांच्या संघाने टॅग किंवा टॅकलमधून मिळालेल्या प्रत्येक गुणासाठी त्यांना परत आणले जाते.नवीन पिढी या खेळात अजूनही रस घेतेय. मोबाईल विश्व् दूर सारत असच दरमजल करावी ही प्रामाणिक इच्छा आणि महत्त्वकांशा अथर्व सारख्या खेळाडूंमध्ये दिसते. अथर्वच्या या यशा बद्दल त्याच्यामुळ गावी त्याचे कौतुक केले जात आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -