मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : विश्व वारकरी संघ देवगड तालुक्याच्या कार्याध्यक्षपदी गावचे सुपुत्र मंगेश बोरकर यांची निवड झाल्या बद्दल श्री देवी भगवती मंदिर मुणगे येथे देवस्थान समिती अध्यक्ष दिलीप महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विश्ववारकरी संघ कोकण विभागाच्या वतीने सदर सन्मान करण्यात आला. त्या वेळी कोकण विभागाचे उपाध्यक्ष.ह.भ.प नंदादिप वंजारे महाराज,देवस्थान समिती अध्यक्ष श्री.दिलीप महाजन आदी उपस्थित होते. यावेळी विश्व वारकरी संघ देवगड तालुकाच्या वतीने मुणगे गावातील,प्रतिष्ठीत व्यक्ती,जेष्ठ भजनी बुवा,व नवोदित भजनी बुवांचा सन्मान ह.भ.प आशुतोष घाडी यांनी केला. यावेळी विश्वस्त देवदत्त पुजारे, महेंद्र बोरकर, गोवींद सावंत , दादा वळंजु,प्रमोद वळंजु ,समिर महाजन,अक्षय बोरकर, मयुर ठाकुर,संतोष बोरकर,विनोद सावंत, धाकोजी सावंत,अमित सावंत,अविनाश घाडी ,वैभव शेटये , अथर्व सावंत,चंद्रकात रासम , शंकर नाटेकर,भरत सावंत आदी उपस्थित होते.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -