कणकवली / उमेश परब – एसटी कर्मचाऱ्यांच्या विलनीकरण मुद्द्यावर आंदोलन करत आहेत एसटी कर्मचारी ठाम असले तरी आज कणकवली आगारातुन दुपारी २.१५ वाजता कणकवली सावंतवाडी बस ४ प्रवाशांना घेऊन सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरु असून काही मोजकेच कर्मचारी कामावर आले आहेत. प्रशासन त्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून एसटी सुरु करण्यासदर्भात ठोस पावले उचलत आहेत. चोख पोलीस बंदोबस्त ठेवत कणकवली ते सावंतवाडी बस कणकवली आगारातून रवाना करण्यात आली आहे.यावेळी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ ,पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर,विभागीय वाहतूक अधिकारी मोहन खराडे,कामगार अधिकारी एल. आर.गोसावी,सुरक्षारक्षक अधिकारी भानुदास मदने व चालक कासले उपस्थित होते.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -