स्थानिकांची मदतीसाठी धाव सुदैवाने जीवित हानी टळली.
कणकवली / उमेश परब – फोंडा घाटाच्या सुरुवातीलाच, खिंडीपासून पहिल्याच युटर्न वरील तीव्र वळणावर वेगावरील अंदाज चुकल्याने, कोल्हापूर कडून फोंड्याच्या दिशेने, फरशी भरून येणारा २० चाकी ट्रक ,वरील रस्त्यावरून खालच्या रस्त्यावर एका बाजूला कोसळला. ट्रक ची चाके वर झाली , व ट्रकचे अतोनात नुकसान झाले . ड्रायव्हरला किरकोळ दुखापत व मार बसला. रविवारी रात्री साडे अकरा च्या दरम्यान हा अपघात घडला. मोठा आवाज ऐकून लगतच्या घोलप हाॅटेल , पवन भालेकर आणि अन्य स्थानिक लोकांनी ड्रायव्हर अल्ताफ गुलाल तांबोळी (वय 34 वर्ष,राहणार पेरले- कराड) यांना बाहेर काढून पाणी- जेवण दिले . वाहतूक सुरळीत केली . सकाळी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ड्रायव्हरला जेवण- पाणी पाण्याची मदत देताना, वहातुकीतील अडथळा दूर केला.सद्या अवजड वाहनांची वाहतूक यामार्गे वाढल्याने व त्यावर कोणाचाही निर्बंध नसल्याने वारंवार अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे…….