आचरा/विवेक परब : यशराज प्रेरणा आचरा च्या वतीने रविवार दिनांक ५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ६ ते ८ या वेळात आ: हायस्कूल समोर रस्त्यावरील गतिरोधक वर रंगकाम करण्यात आले. तसेच रस्त्याच्या कडेचे रान , त्यात असलेल्या काचेच्या फुटलेल्या बाटल्या , दगड , प्लास्टिक बॉटल उचलून शाळेच्या मुलांना सहज चालता येईल अशी वाट साफ करण्यात आली. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे किंवा अपघात होऊच नये या हेतूनेच हा उपक्रम करण्यात आला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष अडवोकेट. सायली आचरेकर , कार्यवाह मीनल कोदे , मार्गदर्शक सौ मिताली कोरगावकर , अध्यक्ष मंदार सरजोशी, श्री रामेश्वर पतसंस्थेचे अभिजीत उर्फ राजा जोशी यांनी मेहनत घेतली़
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -