शिरगाव/संतोष साळसकर: सिंधुदुर्ग कुडाळचे सुपुत्र परशुराम गंगावणे यांना राष्ट्रपतींचे हस्ते पदमश्री पुरस्काराने गौरविण्यात आले, त्याबद्दल प्रगत सिंधुदुर्ग मुंबई व श्रीम.मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने विशेष सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दयानंद चौधरी,सचिव संदीप साळसकर,सदस्य प्रभाकर चव्हाण.तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र एड. संग्राम देसाई यांची महाराष्ट्र, गोवा, दीव दमण, राज्याचे बार कौन्सिलचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचेही शाल श्रीफळ व विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी, एड.अजित भणगे, जि.प.मा.उपाध्यक्ष रणजित देसाई, उद्योगपती बापू नाईक, सरपंच निलेश साळसकर, उपसरपंच संदेश मटकर, पं.स.सदस्य प्राजक्ता प्रभू, राजा प्रभु, व इतर मान्यवर उपस्थित होते.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -