बेस्टच्या आणिक आगार कलादालनात झाला कार्यक्रम .
मसुरे / प्राजक्ता पेडणेकर : मुणगे गावचे सुपुत्र स्व. अविनाश विठ्ठल बोरकर यांनी बेस्ट उपक्रमामध्ये पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असतानाच कलाक्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव आणि भावी पिढीला प्रोत्साहित करण्याकरिता नुकतेच त्यांच्या तसबीरीचे अनावरण करण्यात आले.बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीने कै रमेश रणदिवे कलादालन, आणिक आगार – मुंबई येथे स्व. अविनाश बोरकर यांच्या तसबीरीचे अनावरण जेष्ठ अभिनेते संजय मोने यांच्या हस्ते करण्यात आले.बेस्टच्या वतीने होणाऱ्या नाट्य स्पर्धेत बोरकर यांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा. कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून व्यावसाईक रंगभूमीवरील अनेक कलाकारांशी त्यांचे जवळचे संबंध होते. बेस्ट मध्ये सेवा बजावताना त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक एकांकिकाना पारितोषिके प्राप्त झाली होती. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना बोरकर यांच्या कार्या बद्दल गौरवोद्गार काढले.यावेळी अभिनेते संजय मोने, अनिल गवस, बेस्ट समिती सदस्य अनिल कोकीळ, डॉ राजेंद्र पाटसुते, धनंजय पवार, प्रकाश मयेकर, विशाखा सहस्त्रबुद्धे, निखिल मयेकर, विजय बोरकर, निकेता बोरकर, मानद सचिव शेखर कवळे, सरचीटणीस विजय सुर्यवंशी, उदय हाटले, अभय चव्हाण, भुषण मेहेर, संदीप खाराडे, चारुदत्त वैद्य, यतीन पिंपळे, पांडुरंग दाभोळकर, सुरेश अढळराव, विवेक पितांबरे, दिलीप लिगम, योगेश पाटील, गणेश जांभे, वसंत राणे, दीप कारेमोरे, सुदर्शन पाटील, विरेंद्र बेंद्रे, अनिल चौगुले आदि उपस्थित होते.