बांदा / राकेश परब : बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाच्या वार्षिक पदयात्रा उपक्रमाला बांदा ते माणगाव या पदयात्रेने मंगळवारी आरंभ होत आहे. मंगळवार दि.७ डिसेंबर रोजी बांदा येथील पदयात्री भाविक बांदा ते माणगांव असा पायी प्रवास करुन प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज संस्थापित श्री दत्तमंदिराचे दर्शन घेणार आहेत. सकाळी श्री देव बांदेश्वर भुमिका यांना वंदन करुन पदयात्रेला आरंभ होणार आहे. पदयात्रेत सहभागी होणाऱ्या पदयात्रींनी पदयात्रा मंडऴ अध्यक्ष उमेश मयेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडऴातर्फे करण्यात आले आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -