25.9 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

पूरबाधित कलमठवासीय, फोंडाघाट कातकरी कुटूंबियांना राष्ट्रवादीने दिला मदतीचा हात…

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली / उमेश परब-
आधीच कोरोनामुळे होरपळलेल्या सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला आहे.त्यात आता जुलै महिन्यातील पुरामुळे झालेल्या अपरिमित हानीने संकटग्रस्तांचे जीवनच उघड्यावर पडले.अनेकांचे संसारातील साहित्य वाहून गेले.अतिवृष्टीमुळे साठवलेला अन्नगोटाही खराब झाला.पूरबाधितांचे अश्रू पुसत त्यांना पुन्हा नव्याने जगण्याची शक्ती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मदत करण्याची सूचना पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली होती. त्यांच्या सुचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संपूर्ण सिंधुदुर्गात पूरबाधितांना मदत देण्यात येत आहे.त्यानूसार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुरबाधित फोंडाघाट येथील आदिवासी कातकरी वस्तीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू तसेच संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.तसेच कणकवली तालुक्यातील कलमठ गुरववाडीत जानवली नदीच्या पुराने बाधित झालेल्या कुटुंबियांना तसेच फोंडाघाट येथील आदिवासी कातकरी बांधवाना जीवनावश्यक वस्तूंसह ताट, तांब्या, टोप, पेला, ग्लास आदी संसारोपयोगी साहित्य तसेच खाऊवाटपही करण्यात आले.

यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष राजू पावसकर, कुडाळ नगरसेवक सर्फराज नाईक, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ.लिंगावत, अखंड लोकमंचचे नामानंद मोडक, शैलजा कदम, समीर आचरेकर, सागर वारंग, सतीश जाधव, अजय जाधव, ऍड.जयराज सावंत, देवेंद्र पिळणकर, सुजय शेलार आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली / उमेश परब-
आधीच कोरोनामुळे होरपळलेल्या सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला आहे.त्यात आता जुलै महिन्यातील पुरामुळे झालेल्या अपरिमित हानीने संकटग्रस्तांचे जीवनच उघड्यावर पडले.अनेकांचे संसारातील साहित्य वाहून गेले.अतिवृष्टीमुळे साठवलेला अन्नगोटाही खराब झाला.पूरबाधितांचे अश्रू पुसत त्यांना पुन्हा नव्याने जगण्याची शक्ती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मदत करण्याची सूचना पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली होती. त्यांच्या सुचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संपूर्ण सिंधुदुर्गात पूरबाधितांना मदत देण्यात येत आहे.त्यानूसार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुरबाधित फोंडाघाट येथील आदिवासी कातकरी वस्तीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू तसेच संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.तसेच कणकवली तालुक्यातील कलमठ गुरववाडीत जानवली नदीच्या पुराने बाधित झालेल्या कुटुंबियांना तसेच फोंडाघाट येथील आदिवासी कातकरी बांधवाना जीवनावश्यक वस्तूंसह ताट, तांब्या, टोप, पेला, ग्लास आदी संसारोपयोगी साहित्य तसेच खाऊवाटपही करण्यात आले.

यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष राजू पावसकर, कुडाळ नगरसेवक सर्फराज नाईक, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ.लिंगावत, अखंड लोकमंचचे नामानंद मोडक, शैलजा कदम, समीर आचरेकर, सागर वारंग, सतीश जाधव, अजय जाधव, ऍड.जयराज सावंत, देवेंद्र पिळणकर, सुजय शेलार आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!