रमाबाई नारायण प्रभूझांटये चॅरिटेबल ट्रस्टतर्फे देणगीतून उभारलेली समाजोपयोगी प्रकल्प.
रेडी | सुयोग पंडित : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डाॅक्टर विवेक रेडकर व रमाबाई नारायण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून समाजासाठी अथक कार्यरत रहाणार्या विसावा प्रकल्पाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन रेडी येथे झाले आहे.
डाॅक्टर रेडकर हाॅस्पिटल रिसर्च सेंटर, रेडी येथील या सोहळ्यात स्वतः डाॅक्टर विवेक रेडकर, रमाबाई नारायण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री सुरेश झांटये हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी डाॅक्टर सीमाली रेडकर,जि.प.चे नितेश राऊळ यांनीही आपले विचार व मनोगत व्यक्त केले.अनेक मान्यवर, प्रभूझांटये कुटुंबिय आणि रेडकर हाॅस्पिटल रिसर्च सेंटरशी संलग्न असे सर्वजण उपस्थित होते.
विसावा प्रकल्पाअंतर्गत ज्या व्यक्तींचे उपचार तथा देखभाल त्यांच्या नातेवाईक व आप्तेष्टांकडून शक्य नाही अशांसाठी उपचार घेऊन रहाण्याची व दीर्घकालीन उपचार वास्तव्याची सेवा दिली जाणार आहे .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.रविकिरण तोरसकर यांनी केले.