मालवण | प्रतिनिधी :पर्यावरण विषयक जाणीव जपताना वृक्षारोपण व संवर्धन विषयक जनजागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने रोटरी क्लब, मालवणच्या वतीने मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलच्या परिसरात तसेच मालवण येथील टोपीवाला बोर्डिंग ग्राऊंड येथे माडाच्या झाडाचे (कल्पवृक्षाचे) रोपण रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष उमेश सांगोडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष उमेश सांगोडकर यांच्यासह रोटरी क्लबचे मालवण सचिव रतन पांगे, सुहास ओरसकर, संजय गावडे, महेश काळसेकर आदी उपस्थित होते. भंडारी हायस्कुल येथे करण्यात आलेल्या कल्पवृक्ष लागवडीप्रसंगी हायस्कुलचे मुख्याध्यापक व्ही. जी. खोत, पर्यवेक्षक हणमंत तिवले, शिक्षक आर. बी. देसाई शिपाई विलास वळंजू आदी उपस्थित होते.