27.1 C
Mālvan
Saturday, April 5, 2025
IMG-20240531-WA0007

कै.माधव हरी अळवणी यांच्या स्मरणार्थ बांदा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या हॉलसाठी पाच लाख रुपयांची देणगी..!

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी विविध कार्यकारी सेवा संस्थांचा मोठा वाटा असतो.ही संस्था म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांचा कणा असतो. अशा संस्थेची इमारत सुद्धा चांगली असली पाहिजे त्यासाठी सर्वांचा हातभार असण गरजेचा आहे ,असे उद्गार श्रीपाद माधव अळवणी यांनी बांदा येथे काढले. त्यांनी कै. माधव हरी अळवणी यांच्या स्मरणार्थ संस्थेचा हॉलसाठी पाच लाख रूपयाची देणगी दिली या प्रसंगी ते बोलत होते.
बांदा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या हॉलच्या बांधकामासाठी निधी संकलन करण्याचे काम सध्या सुरु आहे. श्रीपाद अळवणी यांनी नुकताच आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ पाच लाखाचा धनादेश संस्थेचे चेअरमन घनश्याम बांदेकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी सेक्रेटरी लाडू भाईप, संजय चांदेकर, देऊ माळगांवकर, प्रमोद अळवणी, दुर्गाप्रसाद अळवणी, लक्ष्मण सावळ, मयुरी परब, बाळू उर्फ राजाराम सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी चेअरमन घनश्याम बांदेकर यांनी अळवणी कुटुंबियांचे आभार व्यक्त करत सदरची इमारत गावाला अभिप्रेत अशी करू असा शब्द उपस्थितांना दिला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी विविध कार्यकारी सेवा संस्थांचा मोठा वाटा असतो.ही संस्था म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांचा कणा असतो. अशा संस्थेची इमारत सुद्धा चांगली असली पाहिजे त्यासाठी सर्वांचा हातभार असण गरजेचा आहे ,असे उद्गार श्रीपाद माधव अळवणी यांनी बांदा येथे काढले. त्यांनी कै. माधव हरी अळवणी यांच्या स्मरणार्थ संस्थेचा हॉलसाठी पाच लाख रूपयाची देणगी दिली या प्रसंगी ते बोलत होते.
बांदा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या हॉलच्या बांधकामासाठी निधी संकलन करण्याचे काम सध्या सुरु आहे. श्रीपाद अळवणी यांनी नुकताच आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ पाच लाखाचा धनादेश संस्थेचे चेअरमन घनश्याम बांदेकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी सेक्रेटरी लाडू भाईप, संजय चांदेकर, देऊ माळगांवकर, प्रमोद अळवणी, दुर्गाप्रसाद अळवणी, लक्ष्मण सावळ, मयुरी परब, बाळू उर्फ राजाराम सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी चेअरमन घनश्याम बांदेकर यांनी अळवणी कुटुंबियांचे आभार व्यक्त करत सदरची इमारत गावाला अभिप्रेत अशी करू असा शब्द उपस्थितांना दिला.

error: Content is protected !!