रमाबाई नारायण प्रभूझांटये चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या देणगीतून उभारली वास्तू.
मालवण | सुयोग पंडित : समाजात सध्या धकाधकीत तथा अन्य कारणांनी नातेवाईक किवा आप्तेष्टांकडून आपत्कालीन किंवा दीर्घकालीन उपचार शक्य नसलेल्या गरजू रुग्णांसाठीची सेवा असलेला रेडकर हाॅस्पिटल रिसर्च सेंटर, रेडी यांचा विसावा ह्या प्रकल्पाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन दिनांक 29 नोव्हेंबर रोजी होत आहे.
रमाबाई नारायण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या देणगीतून उभारण्यात आलेल्या या नूतन वास्तूच्या शुभारंभानिमित्त रेडकर हाॅस्पिटल रिसर्च सेंटर, रेडी येथे सत्यनारायण पूजा व तीर्थप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास सर्वांनी आवर्जून उपस्थिती लावून या सामाजिक आरोग्य व जीवनसेवा प्रकल्पाची माहिती घेऊन व मार्गदर्शन करण्याचेही निमंत्रण रिसर्च सेंटर व ट्रस्टतर्फे देण्यात आले आहे.