बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाफोली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवारी २७ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.रात्री मामा मोचेमाडकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. सर्व भाविक भक्तांनी कोरोना संबधीत शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून ओटी भरणे,मंदिराभोवतीची पालखी प्रदक्षिणा सोहळा,देवीचे दर्शन घ्यावे असे आवाहन देवस्थान कमिटी अध्यक्ष विलास गवस यांच्या वतीने करण्यात आले आहे.