बांदा |राकेश परब : देशात,राज्यात व पर्यायाने जिल्ह्यातही कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक असून भविष्यात दोन्ही डोस घेतलेल्यानाच शासकीय कागदपत्रे मिळणार आहेत. त्यामुळे बांदा शहरातील सर्व नागरिकांनी डोस घेऊन सहकार्य करावे असे आवाहन सरपंच अक्रम ख़ान यांनी केले आहे.
बांदा शहरात प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक १ मध्ये ९० टक्के तर प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक २ मध्ये ९३ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. भविष्यात कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यावरच शासकीय दाखले मिळणार आहेत. तसेच ऑनलाईन तिकीट बुकिंग, प्रवासाची देखील मुभा मिळणार आहे. त्यामुळे राज्यात, देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे.
बांदा शहरातील ज्या नागरिकांनी अद्यापपर्यंत लस घेतली नसेल त्यांनी ती तात्काळ घ्यावी, यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दर दोन दिवसांनी लसीकरण मोहीम राबविण्यात येते. यासाठी जनजागृती सुरू असून लस घेण्यासाठी ग्रामपंचायत किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपर्क साधावा असे आवाहन ख़ान यांनी केले आहे.