मसुरे | प्रतिनिधी : श्री क्षेत्र खोटले येथे प्रकट दिन उत्सव ३१ मार्च रोजी संपन्न होत आहे. धार्मिक कार्यक्रम अंतर्गत काकड आरती, अभिषेक, सत्यनारायण पूजा, कुंकुमार्चन होणार आहे तसेच मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे.
या उत्सवामध्ये प्रमुख पालखी सोहळा आहे. जिल्ह्यातील अनेक नाववंत ढोल पथके, फुगडी पथके, चित्ररथ तसेच दिंडी भजने हे पालखी सोहळ्याचे आकर्षण ठरणार आहे. देवगड नाद येथील ब्राह्मण देव महिला मंडळ समई नृत्य करणार आहेत त्याच वेळी सुप्रसिद्ध चित्रकार श्री समीर चांदरकर हे प्रत्यक्ष रंगमंचकावर श्री स्वामी समर्थ महाराज यांचे चित्र रेखाटनार आहेत.
श्री नरसिंह भजन मंडळ ओरोस येथील संगीत विशारद बुवा श्री अमित मेस्त्री यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. कौतुक समारंभ मध्ये जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या मायलेकींना हिरकणी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे व महाप्रसाद नंतर रात्री अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांचा संत गोमाई हा नाट्यप्रयोग होणार आहे. स्वामीं नामाचा जागर पहाटे पर्यंत होणार आहे. या स्वामी आनंद उत्सवामध्ये भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन मठाधिपती श्री गणेश घाडीगावकर (अध्यक्ष, उत्सव समिती) यांनी केलेले आहे.