तळेरे | प्रतिनिधी : असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे सेक्रेटरी श्री संदेश शेट्ये व त्यांचे कर्मचारी यांनी केले होते.

यावेळी आश्रमातील आजी आजोबा व कर्मचारी यांनी नृत्य व गाणी सादर करत एकमेकांवर रंगांची उधळण केली आणि अल्पोपहार व भोजनाचा आस्वाद घेतला.
यावेळी श्री समीर मिठबावकर, कु अश्विनी पटकारे, कु सायली तांबे, सौ अस्मि राणे, सौ अमृता इंदप, कु ऋतुजा इंदप, श्री सखाराम कोकरे , सौ सायली इंदप, श्रीम भारती गुरव, सौ सारिका सावंत, सौ सानिया इंदप, सौ अनुजा आचरेकर, सौ मंजिरी राणे, सौ प्रतीक्षा सावंत उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्मचारी सौ अस्मि राणे यांनी केला व कार्यक्रमाची सांगता कु अश्विनी पटकारे यांनी केली.
सौजन्य : निकेत पावसकर