शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती.
आचरा | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत पार पडला. यासोबतच अन्य विकासकामांचा शुभारंभ तालुकाप्रमुख महेश राणे, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, डॉ प्रमोद कोळंबकर, मनोज हडकर यांच्या हस्ते करण्यात आला. या विकास कामांमध्ये खाबंलवाडी ते सडयेवाडी खडीकरण डांबरीकरण करणे, घाडीवाडी ते तोंडवळी फाटा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ग्रामपंचायत कार्यालय वायंगणी येथे पेवर ब्लॉक बसवणे, घाडीवाडी येथे स्मशानशेड बांधणे या कामांचा समावेश आहे.

सरपंच रुपेश पाटकर यांच्या हस्ते जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे ग्रामपंचायतच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच इतर मान्यवरांचे स्वागत करुन ग्रामदेवता श्री देव रवळनाथ चरणी गावाच्या विकासासाठी साकडे घालण्यात आले. यावेळी वायंगणी सरपंच रूपेश पाटकर, मालवण तालुका प्रमुख महेश राणे, डॉ प्रमोद कोळंबकर, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, रावजी सावंत, सदा राणे, मंदार लुडबे, दिपक पाटकर, जयप्रकाश परूळेकर, संतोष मिराशी, मनोज हडकर, विलास परब, अण्णा धुळे, आनंद कांबळी, सुनील वायंगणकर, संतोष वायंगणकर, दामोदर वायंगणकर, तात्या दुखंडे, मोहन दुखंडे, हर्षद दुखंडे, कमलेश माळकर, रामदास प्रभू, विलास घाडीगांवकर, प्रदीप घाडीगांवकर, प्रसाद सावंत, एकनाथ सावंत, संदिप सावंत आदी उपस्थित होते.
विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल सरपंच रुपेश पाटकर यांनी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार व्यक्त केले.