मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील कांदळगावच्या त्रिशाला कदम यांना पंचशील ट्रस्ट ओरोस, आदर्श नगर सिंधुदुर्ग यांच्यावतीने शीला खोटलेकर स्मृती राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन ठाणे पश्चिम येथे मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी भंते संघरत्न, ट्रस्टचे अध्यक्ष संजय खोटलेकर, वृंदा पेंडूरकर अजित सोनवडेकर, सिद्धार्थ जंगम, पराग तांबे, अमर जाधव, शितल पवार, दिनेश जाधव, आणि पंचशील ट्रस्टचे सदस्य सदस्य उपस्थित होते.

त्रिशाला कदम यांच्या पुरस्काराबाबत कांदळगाव, मसुरे, मालवण भागातून अभिनंदन होत आहे.