मसुरे | प्रतिनिधी : ग्रामपंचायत वरची गुरामवाडी येथे खेळ पैठणीचा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच शेखर पेणकर, उपसरपंच धोंडी कामतेकर व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य प्रशांत टेंबुलकर, ग्रामपंचायत सदस्या श्रद्धा गुराम, मयुरी कुबल संपदा वालावलकर, सुप्रिया गुराम सौ. विद्या गिरकर या उपस्थित होत्या. सूत्रसंचलन श्री.भारत पेंडूरकर केले. त्यांना श्री. वराडकर यांनी साथ दिली.

सौ. सोनाली भोजणे गुराम ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाच्या विजेत्या ठरल्या. उपविजेत्या सौ. मयुरी कुबल, उत्तेजनार्थ म्हणून गुराम या सर्वांना सौ. पेणकर, सौ. वायंगणकर ग्रामपंचायत सदस्या यांच्या हस्ते पैठणी देण्यात आल्या.


सर्व सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली.या कार्यक्रमास ग्रामपंचायत कर्मचारी संकेत परूळेकर, श्रीकांत भोजने, महादेव गोठणकर लोके तसेच गावातील बचतगटातील पदाधिकारी, महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे स्वागत व आभार ग्रामपंचायत अधिकारी श्री. लक्ष्मण धोंडी सरमळकर यांनी मानले.