माजी विद्यार्थी श्री. डेरीक फिलीप कोयलो यांची प्रमुख उपस्थिती.
मालवण | प्रतिनिधी : मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलच्या पूर्व प्राथमीक विभागाचा ग्रॅज्युऐशन डे उत्साहात संपन्न झाला. १२ मार्च रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रशालेचे माजी विद्यार्थी व लिव्हरपुल विद्यापिठातून (युनायटेड किंगडम, इंग्लंड ) एमबीए केलेले आणि सध्या कॅथे पॅसिफिक एअरलाईन्स ( हॉन्गकाॅन्ग) येथे अधिकारी पदावर कार्यरत असलेले श्री. डेरीक फिलीप कोयलो यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांची मंचावर मान्यवर उपस्थिती होती.

मंचावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे श्री. डेरीक फिलीप कोयलो यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थितांनी सिनीअर केजी तील विद्यार्थ्यांच्या इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठी सदिच्छा दिल्या.





मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. पेरपेच्युअल फर्नांडिस व विद्यार्थ्यांनी केले तर शिक्षिका सौ. सुजाता चोडणेकर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी प्रशालेचा शिक्षक व कर्मचारी वृंद आणि पालक उपस्थित होते.