ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या माणगाव येथे २२ मार्च ते २९ मार्च या कालावधीत, माणगाव ग्रामस्थ आयोजित ‘दशावतार नाट्यमहोत्सव २०२५’ संपन्न होत आहे. माणगाव बाजार येथे सायंकाळी ७ वाजल्यापासून या नाट्यमहोत्सवातील दशावतार नाटकांचे सादरीकरण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या नाट्यमहोत्सवात २२ मार्च रोजी मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ, मोरे यांचे ‘वेडा चंद्रहास’, २३ मार्च रोजी जय हनुमान नाट्य मंडळ, आरोस यांचे ‘नल दमयंती, २४ मार्च रोजी चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, सुधा दळवी यांचे ‘यमाचे लग्न’, २५ मार्च रोजी आजगांवकर दशावतार नाट्य मंडळ, आजगांव यांचे ‘श्रीयाळ चांगुणा’, २६ मार्च रोजी चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, देवेंद्र नाईक यांचे ‘रती मदन’, २७ मार्च रोजी माऊली दशावतार नाट्य मंडळ, इन्सुली यांचे ‘दक्ष यज्ञ, २८ मार्च रोजी कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, बाबी कलिंगन यांचे ‘ययाती देवयानी’ आणि २९ मार्च रोजी नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ, मोचेमाड यांचे ‘राखनदार’ हा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
नाट्यरसिकांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.