सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने अध्यक्ष अजय शिंदे यांचे उपस्थितीचे आवाहन.
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व क्रीडा पंचांची एकजुट, सन्मान, मैदानावरील पंच सुरक्षितता, मेहनताना आणि क्रीडा पंचांच्या विषयक अनेक बाबींवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी व पंचांना एकत्रित करुन ड्रेसकोड, ओळखपत्र यासंदर्भात निश्चिती करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने क्रीडा पंचांसाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस हायस्कूल येथे शुक्रवार दिनांक २१/३/२०२५ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता जिल्ह्यातील सर्व पंचांची ही सभा आहे.
या पंच बैठकीत पंचांसाठी नियमावली, पंचाचा प्रवास खर्च , दैनंदिन मानधन, पंचांचा गणवेश, पंचांचे ओळखपत्र यासाठी चर्चा करून अंतिम निर्णय घेतले जातील. या सभेला क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाध्यक्ष अजय शिंदे, कार्याध्यक्ष विजय मागाडे, सचिव नंदकिशोर नाईक, सह सचिव कमलाकर धुरी, उपाध्यक्ष जयराम वांयगणकर, विजय मयेकर, सुदिन पेडणेकर, कोल्हापूर विभागीय उपाध्यक्ष मारुती माने, कोल्हापूर विभागीय संघटक अजय सावंत, कोल्हापूर विभागीय एक्झिक्युटिव्ह मेंबर संतोष तावडे आदी मार्गदर्शन करणार आहेत.
या सभेला जिल्ह्यातील सर्व जुन्या, नवीन पंचांनी उपस्थित रहावे असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी केले आहे.