आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य.
मालवण भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिदरकर यांची माहिती.

श्री निलेश राणे ( आमदार, कुडाळ मालवण विधानसभा )
मालवण | ब्यूरो : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे राज्य परिवहन महामंडळाकडून मालवण एसटी आगाराला पाच नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहेत. या बसेसचे लोकार्पण आ. राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दि. १६ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वा. मालवण बस स्थानकात आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.

श्री. धोंडी चिंदरकर ( भाजपा मालवण तालुकाध्यक्ष )
महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष श्री. धोंडी चिंदरकर यांनी केले आहे.