दर्पण प्रबोधिनीच्यावतीने पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा सत्कार
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : जिल्ह्यातील व पर्यायाने देशातील लोककला संवर्धनसाठी देदिप्यमान कामगिरी करणारे सिंधुदुर्गचे प्रयोगशील कलावंत पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे यांनी संपूर्ण देशात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. आम्हा सिंधुदुर्गवासियांना याचा सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गचे अध्यक्ष राजेश कदम यांनी कुडाळ- पिंगुळी येथे केले. भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान म्हणून दर्पण प्रबोधिनीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.यावेळी
निलेश ठाकूर, विशाल हडकर, अजय तांबे, दिलीप तांबे, किशोर कदम, आनंद तांबे आदी उपस्थित होते.