आंगणेवाडी वार्षिकोत्सवात राजकीय नेतेमंडळी व अनेक चाकरमानी, जिल्हावासीय यांच्या गाठीभेटी.
ब्यूरो न्यूज : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या, मालवण तालुक्यातल्या मसुरे आंगणेवाडी वार्षिकोत्सवास मालवण कुडाळचे माजी आमदार वैभव नाईक यांनी कार्यर्त्यांसह भेट देऊन श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर यांनीही जत्रोत्सवाला उपस्थिती दर्शवत दर्शन घेतले.



आंगणेवाडीत आलेल्या भविकांना शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या माध्यमातून दरवर्षींप्रमाणे मोफत बिसलेरी पाणी वाटप करण्यात आले त्या सेवेत वैभव नाईक सहभागी झाले. तसेच जत्रोत्सवात विविध ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. याप्रसंगी राजकीय नेतेमंडळी व अनेक चाकरमानी, जिल्हावासीय यांच्या वैभव नाईक यांनी भेटीगाठी घेतल्या.


यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी,नितीन वाळके,यतीन खोत, बाबी जोगी, पराग नार्वेकर,मंदार गावडे,मंदार ओरसकर,संमेश परब,उमेश मांजरेकर, महेश जावकर, पूनम चव्हाण, दीपा शिंदे, शिल्पा खोत, नीनाक्षी शिंदे, किरण वाळके, अमित भोगले, राजेश गावकर, समीर लब्दे, विजय पालव, भगवान लुडबे, महेंद्र म्हाडगुत, मनोज मोंडकर, तपस्वी मयेकर यांसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.