बांदा येथील स्पंदन युथ फाऊंडेशनच्या कार्यालयाला दिली भेट….!
बांदा | राकेश परब : गोवा येथे आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवासाठी अभिनेते सुशांत शेलार हे गोवा येथे जात असताना त्यांनी बांदा येथील स्पंदन युथ फाऊंडेशन कार्यालयाला भेट दिली.
यावेळी ते बोलताना म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्ग सौंदर्य लाभलेला जिल्हा आहे.या जिल्याला समुद्र किनारा असल्याने भविष्यात या जिल्ह्यात स्पंदन युथ फाऊंडेशनच्या माध्यमातुन चित्रिकरण करण्याचा माझा मानस आहे. याचा फायदा स्थानिक कलाकारांना होणार आहे.कोकणातील दशावतार लोक कलेमधुन कलाकार घडले आहेत. मात्र त्याना म्हणावी तशी संधी मिळत नाही.कोकणात अनेक कलाकार घडले आहेत.
या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्रिकरण झाल्यास त्याचा स्थानिक कलावंताना निश्चितच फायदा होणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.स्पंदन युथ फाऊंडेशनचे संस्थापक सिध्देश महाजन यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.