मानसोपचार तज्ञ डाॅ. रुपेश पाटकर यांचे मार्गदर्शन.
जयश्री जयराम पवार प्रतिष्ठान मार्फत आयोजीत कार्यक्रम.
मालवण | प्रतिनिधी : आजचे युग हे स्पर्धात्मक युग आहे. या ताण तणावाच्या युगात ताण कमी करणे. संवाद साधणे, सहानुभूती ने वागणे तसेच सतत येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी सकारात्मक मार्गांनी विचार करणे आवश्यक असून भावनिक बुद्धिमत्ता जोपासना केली तर आपले चांगले व्यक्तिमत्व आपण उत्तम प्रकारे बनवू शकतो असे प्रतिपादन प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी येथे बोलताना केले
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे जयश्री जयराम धारपवार प्रतिष्ठान या सामाजिक शैक्षणिक कार्य करणाऱ्या समिती मार्फत ‘भावनिक बुद्दिमता व व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर शालेय समिती अध्यक्ष श्री सुधीर वराडकर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, धारपवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत धारपवार व व्याख्याते डॉ. रुपेश पाटकर, श्री. गोरक्ष परब श्री भूषण गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. श्रीकांत धारपवार यांनी समिती चे सामाजिक व शैक्षणिक कार्याविषयी माहिती देताना आज शिक्षण व शाळेत शिक्षण घेणारी मुले व आज त्याच्या गरजा व त्यांना करण्यात येणारे समुपदेशन याबद्दल माहिती सांगितली
यावेळी विद्यार्थ्यांनी व्याख्यानाचा लाभ घेऊन भावनिक बुद्धिमत्ता तपासण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांचेकडून डॉ. रुपेश पाटकर यांच्या सामाजिक कार्यासाठी कार्यकर्ता प्रबोधन धारपवार प्रतिष्ठान तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेतील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.