शिवप्रभुंच्या पराक्रमावर काव्यात्मक शिवचरीत्र रचणार्या कवि भूषण यांच्या छंदात्मक काव्य रचनांचा सादरीकरण सोहळा.
हिंदवी स्वराज्याचा तोफगाडा लोकार्पण सोहळा २०२४ ; गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांचे आयोजन.
प्रतिनिधी : गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य यांचे आयोजन असलेल्या किल्ले विजयदुर्ग येथे हिंदवी स्वराज्याचा तोफगाडा २०२४ लोकार्पण सोहळ्यात शिवभूषण सादरकर्ते श्री. भूषण साटम यांचा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. २८ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न होणार्या या विशेष कार्यक्रमात श्री. भूषण साटम शिवप्रभुंच्या पराक्रमावर काव्यात्मक शिवचरीत्र रचणार्या कवि भूषण यांच्या छंदात्मक काव्य रचना सादर करणार आहेत.