25.6 C
Mālvan
Saturday, December 21, 2024
IMG-20240531-WA0007

बांदा येथे शालेय वेशभूषा स्पर्धा उत्साहात.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील व्ही. एन. नाबर मेमोरीयल स्कूलमध्ये वेशभूषा स्पर्धा संपन्न झाली. लहान मुलांमधील सृजनशीलता व आत्मविश्वास विकसीत करणे हा स्पर्धेचा हेतू होता.

नर्सरी ते ज्युनिअर केजी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना फळे हा विषय होता तर सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांना भाज्या हा विषय दिला गेला होता. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी हेल्पर्स तिसरी चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल लीडर्स व सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मायथॉलॉजिकल कॅरेक्टर्स हे विषय देण्यात आले. यामध्ये नर्सरी मधून शिवांशू विश्राम दळवी पहिला, खेमराज प्रताप कोठावळे दुसरा व अरिबा असिफ शेख हिला तिसरा क्रमांक प्राप्त झाला.

ज्युनियर केजी मधून मोक्ष रौनक पटेल याला पहिला तर अरीयाना राजदत्त बुडकुले दुसरा व उरूज फातिमा शहाबाद शेख यांना तिसरा क्रमांक प्राप्त झाला.

सिनियर केजी मधून ध्रुव दयानंद चव्हाण पहिला, प्रज्ञेश राऊळ दुसरा व मोहसीन रजा खान यांना तिसरा क्रमांक प्राप्त झाला.

इयत्ता पहिली मधून रिवांश गजानन सारंग, उस्मान कलामुद्दीन शेख आणि मंथन जितेंद्र देसाई यांना अनुक्रमे पहिला दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त झाला.

इयत्ता दुसरी मधून शांभवी रोशन पालव, चैतन्य दिनेश नाईक, विहान प्रताप कोठावळे यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त झाला.

इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवीच्या गटामधून सिद्धी सुभाष प्रभूशिरोडकर पहिली निशांत सहदेव बहिरे व हर्ष विजय नाईक दुसरा, फवाद बुरान व स्वरा विरनोडकर यांना तिसरा क्रमांक प्राप्त झाला.

इयत्ता सहावी आणि सातवीच्या गटात अन्वयी पवार पहिली ऋतुराज नाईक दुसरा व खुशी गवस हिला तिसरा क्रमांक प्राप्त झाला.

या स्पर्धेसाठी सहभागी पालक व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले होते. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेशभूषानी व्ही.एन. नाबर स्कूलचा रंगमंच अगदी फळांनी, हिरव्या पालेभाज्यानी नटून आणि देशाच्या वीरांनी सजून गेला होता .भारतीय पुराणातील देवी देवतांच्या वेषभूषेने प्रशाला भक्तिमय झाली होती. वेगवेगळे विषय ठेवल्याने स्पर्धा वैविध्यपूर्ण झाली.

या स्पर्धेचे सूत्रसंचालन शिक्षिका सेजल शेटये आणि सौ. स्नेहा नाईक यांनी केले. बांद्यातील रेश्मा म्हावळणकर व प्रशालेच्या शिक्षिका सौ.शिल्पा कोरगावकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्याने , फळं, भाज्या आपले मदतनीस व ऐतिहासिक व्यक्ती व सर्व गोष्टीचे महत्त्व विद्यार्थ्यांनी जाणून त्याचा आदर करणे ह्या आमच्या हेतूचा सार्थक झाला अशी प्रतिक्रिया प्रशालेच्या वतीने देण्यात आली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!