आंब्रड, कसाल, पावशी विभागात माजी आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी दरम्यान मांडली भूमिका.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी रविवारी कुडाळ तालुक्यातील आंब्रड, कसाल, पावशी या जिल्हा परिषद विभागातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधला. शेवटचा नागरीक जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत काम करण्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली. यावेळी नागरीकांचा उत्स्फ़ूर्त प्रतिसाद लाभला होता.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला जिल्हा संघटक श्रेया परब, तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, उपतालुकाप्रमुख महेश सावंत, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर,माजी उपसभापती जयभारत पालव महिला तालुका प्रमुख स्नेहा दळवी हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आंब्रड येथे विभागप्रमुख विकास राऊळ, सीमा मुंज, प्रवीण भोगटे, सीताराम दळवी, दिनकर परब, सागर वाळके, सचिन दळवी, पीडी सावंत, चंदन ढवळ, भावेश परब, तेजस भोगले, अरुण सावंत, रामू घाडी उपस्थित होते.
कसाल येथे विभागप्रमुख नागेश ओरोसकर, सुनील जाधव, बाळा कांदळकर, अवधूत मालणकर, हरी वायंगणकर, सौ. म्हसकर, संतोष लाड, बाबू शिरोडकर, गणेश कुडाळकर, गिरी मर्तल, श्री. बांबूळकर उपस्थित होते.
पावशी येथे विभागप्रमुख दीपक आंगणे, लीलाधर अणावकर, प्रशांत परब, सुनील कुलकर्णी, सागर भोगटे, बाबा परब,मृणाल परब यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.