मसुरेतील भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल विद्यार्थिनी.
मसुरे | प्रतिनिधी : राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्ग पुरस्कृत कै. पांडुरंग सरनाईक जयंती निमित्ताने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या धृती केशव भोगले हिने तृतीय क्रमांक पटकावला.
तिच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष प्रकाश परब, स्कूल कमिटी चेअरमन संग्राम प्रभूगावकर, संस्था पदाधिकारी बाबाजी भोगले, संस्था सचिव अशोक मसुरेकर, मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.